Maharashtra Lek Ladki Yojana
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते शुभारंभ मुलींना मिळणार 1 लाख रुपये.
Maharashtra Lek Ladki Yojana(महाराष्ट्र लेक लाडकी योजना) : महाराष्ट्र सरकारने राज्यातील मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन योजना सुरु करण्याचे जाहीर केले आहे. ज्याचे नाव लेक लाडकी योजना असे आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प जाहीर केला यामध्ये या योजनेची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकार या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून तर तिच्या शिक्षणापर्यंत सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलींना हि आर्थिक मदत मुलीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दिली जाईल तसेच गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे. तसेच या योजनेद्वारे सरकारकडून मुलीचे वय आणि वर्गानुसार मदत दिली जाईल. या लेखामध्ये आपण लेक लाडकी योजनेचा अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे लागतील याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे. तरी तुम्ही हा लेख संपूर्ण वचावा. लेक लाडकी या योजनेच्या माध्यमातून मुलींना 1 लाख रुपयांचा पहिला हफ्ता देण्यात आला आहे. यामध्ये मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५,०००/- अशी एकरकमी रक्कम दिली जाणार आहे.
महाराष्ट्र लेक लाडकी योजना माहिती
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेक लाडकी या योजनेचा शुभारंभ २०२३-२०२४ या वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान मुलींच्या सक्षमीकारणासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने हि योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे. योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळाल्यानंतर मुलीच्या शिक्षणात कोणतीही अडचण येणार नाही आणि यामुळे समाजातील मुलींबाबतची नकारात्मक विचारसरणी बदलू शकते. (Maharashtra lek ladki yojana)लेक लाडकी या योजनेच्या माध्यमातून मुलींचा सामाजिक स्तर सुधारू शकतो. आता हि योजना मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ह योजना प्रभावी ठरणार आहे. मुलींना या योजनेद्वारे उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोस्ताहन दिले जाणार आहे आणि त्यांना नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यास रुची येईल रोजगार सुद्धा चांगला मिळेल.
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचे काही महत्वाचे मुद्दे
योजनेचे नाव | लेक लाडकी योजना |
योजनेची घोषणा | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | राज्यातील गरीब कुटुंबातील मुली |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेचे उद्दिष्ट | मुलींना शिक्षित आणि सक्षम करणे |
अर्ज प्रक्रिया | लवकरच सुरु होईल |
आर्थिक मदत | मुलीच्या वयाच्या १८ व्या वर्षी ७५,०००/- रुपये |
अधिकृत वेबसाईट | लवकरच सुरु होईल |
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचे उद्देश्य
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना बळकट करण्यासाठी.
- गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून तर त्यांच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणे.
- या योजनेद्वारे मुलींच्या मृत्युचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
- मुलींना चांगल्या तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात शिक्षण घेण्यास मदत होईल.
- लाभार्थी मुलींना त्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी ७५०००/- रुपये दिले जातील.
- ज्यामुळे त्यांना त्यांचे पुढील शिक्षण घेता येईल, आणि त्यांचे भविष्य उजव्ल करता येईल.
- मुलींना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेता येईल.
मुलींना “लेक लाडकी योजनेचा” फायदा कसा मिळेल ?
महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. तरी मुलींना या योजनेंतर्गत 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. हि मदत मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत वेगवेगळ्या टप्यात दिली जाणार आहे. ते आपण पुढे पाहूया.
- गरीब कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास त्या मुलीला ५०००/- रुपये दिले जातील.
- जेव्हा मुलगी पहिल्या वर्गात प्रवेश करत असेल तेव्हा तिला ६०००/- रुपये दिले जातील.
- तर तिसरा हप्ता मुलगी सहाव्या वर्गात गेल्यावर तिला ७०००/- रुपये दिले जाईल.
- तसेच मुलगी अकराव्या वर्गात प्रवेश केल्यावर तिला ८०००/- रुपये दिले जाईल.
- आणि शेवटचा हप्ता मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यावर तिला पुढील शिक्षणासाठी ७५०००/- एकरकमी रक्कम दिली जाईल.
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचे वैशिष्ट्ये
- गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेंतर्गत लाभ दिला जाणार आहे.
- तसेच मुलींना त्यांच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाणार आहे.
- गरीब कुटुंबाना हि मदत मिळाल्याने त्यांना मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचणीना समोर जावे लागणार नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- मुलीचा जन्म हा सरकारी रुग्णालयात झाला असला पाहिजे, आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म झाल्यावर अर्ज करावा लागतो.
- गरीब कुटुंबात मुलगी जन्माला येणे हे या योजनेमुळे आता ओझे मानले जाणार नाही.
- समाजात यामुळे आसमानता दूर करता येईल.
- मुलींबाबत या योजनेमुळे सकारात्मक विचार विकसित होईल.
लेक लाडकी योजनेची पात्रता
- लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मुळचा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या मुलींचेच कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील.
- उमदेवार हा महाराष्ट्रातील गरीब तसेच मागासवर्गीय असावा.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थाचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासठी लाभार्थ्याकडे मोठे घर किवा कुठलेही चारचाकी वाहन नसावे.
- लाभ घेणारा अर्जदाराचे कुटुंब हे कुठल्याही सरकारी कार्यालयात नोकरीला नसावे.
- योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन हे एक लाख पेक्षा जास्त नसावे.
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
योजनेची आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
- मुलीचा पालकांसोबत फोटो.
- मुलीच्या पालकांचे आधार कार्ड.
- केशरी किंवा पिवळ्या रंगाचे शिधापत्रिका.
- पत्याचा पुरवठा.
- अर्ज्दारचा पासपोर्ट साईज फोटो.
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (उत्पन्न दाखला).
- मोबाईल नंबर.
- इमेल आयडी.
- बँक पासबुक खाते.
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा अर्ज कुठे व कसा करावा ?
जसे कि आम्ही तुम्हाला आधी सांगितल्या प्रमाणे, महाराष्ट्र सरकारने वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींसाठी महाराष्ट्र लेक लाडकी योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारने राज्यात हि योजना अद्यापही लागू केलेली नाही. हि योजना सरकारकडून लवकरच सुरु करण्यात येणार आहे, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. या योजनेची अर्ज कारण्याची माहिती हि लवकरच कळवण्यात येईल. शासनाकडून लेक लाडकी योजनेच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्जासंबधी माहिती मिळताच आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे कळवू . ज्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल.
FAQ
1) लेक लाडकी योजना काय आहे ?
लेक लाडकी योजना हि महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबातील मुलींच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी जाहीर केली आहे. या योजनेमध्ये मुलींना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणर आहे.
२) लेक लाडकी योजनेमध्ये मुलींना किती रक्कम मिळणार आहे ?
या योजनेमध्ये मुलींना त्यांच्या जन्मापासून तर मुली १८ वर्षाच्या होईपर्यंत त्यांच्या शिक्षणाचा खर्च सरकार पाच टप्यामध्ये देणार आहे. यामध्ये मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ऐकून ७५००० रुपये एकरकमी दिली जाणार आहे.
3) महाराष्ट्र लेक लाडकी या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे ?
महाराष्ट्रातील पिवळे व केशरी शिधापत्रिका असलेली मुलगीच योजनेसाठी पात्र असणार आहे.