Mukhyamantri Saur Pump Yojana-2023
Mukhyamantri Solar Pump Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना सुरु केलेली आहे. महाराष्ट्रातील शेतकर्यांना शेतात सिंचन करण्यासाठी या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून सोलर पंप उपलबध करून देण्यात येतील.
तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरावी, आणि शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही योजना सुरु केलेली आहे. या योजने मध्ये सोलर पंप बसवण्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान सुद्या दिले जाईल. आपण यामध्ये योजनेची उद्दिष्ट, अर्ज कुठे करायचा आहे, यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती, योजनेसाठी पात्रता व आटी या गोष्टींची माहिती बघणार आहे. जर या योजनेचा तुम्हालाही लाभ घ्यायचा असेल तर हा दिलेला लेख पूर्ण वाचवा.
Mukhyamantri Solar Pump Yojana-२०२३
राज्य सरकारने या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना 1,00,000 कृषी सोलर पंप देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या योजनेअंतर्गत राज्य सरकारने पुढच्या 3 वर्षात टप्याटप्याने 1 लाख सोलर पंप लावण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील शेतकरी या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला जाऊन अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मुख्यमंत्री सौर पंप योजना २०२३ ची वैशिष्ट्ये
तुम्हा सगळ्याना माहिती असेलच आजसुद्धा अनेक शेतकरी आहे जे आपल्या शेतात इलेक्ट्रिक आणि डिझेल पंपंचा वापर करून शेतात सिंचन करतात, आणि यामध्ये त्यांचा खूप खर्च होतो तसेच डीझेल पंप सुधा महाग आहे. तसेच राज्य सरकारने हि गोष्ट लक्षात घेऊन हि योजना सुरु केलेली आहे, सौर कृषी योजने अंतर्गत राज्य सरकारने शेतकरी बांधवांना सकाळी सुद्धा सिंचन करण्यासाठी सौर पंप उपलब्ध करून देणार आहे.
राज्य सरकार सोलर पंप या योजनेअंतर्गत पंपाच्या किमतीच्या ९५% अनुदान देते. लाभ घेणाऱ्या लोकांना फक्त ५% रक्कम भरावी लागेल. तसेच सोलर पंप योजनामध्ये सोलर पंप मिळाल्याने शेतकर्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार आणि त्यांना जास्त किंमतीचा पंप खरेदी करावा लागणार नाही. यामुळे पर्यावरण प्रदूषित होणार नाही. तसेच इंधनाची सुद्धा बचत होईल आणि शेतकर्यांना जास्त खर्च सुधा येणार नाही. तसेच Mukhyamantri Solar Pump Yojana हि संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाची योजना आहे.
Maharashtra Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana | महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२३ फायदे (Benefit)
- महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेमध्ये ५ एकर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकर्यांना 3 Hp आणि ५ एकर पेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकर्यांना ५ Hp सौर पंप दिले जाणार आहे.
- सरकार सोलर कृषी योजनेच्या पहिल्या टप्यात २५ हजार सौर पंप, दुसऱ्या टप्यात ५०००० सौर पंप आणि तिसऱ्या टप्यात २५००० सौर पंप राज्यातील शेतकर्यांना वाटप करणा आहे .
- आधीच ज्या शेतकऱ्यांकडे वीज जोडणी आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- या योजनेमुळे सरकारचा विजेचा अतिरिक्त भार कमी होणार आहे.
महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना २०२३ लाभार्थी पात्रता –
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना २०२३ महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणत राबविण्यात आली आहे. या योजनेसाठी शासनाने काही पात्रता ठरवून दिली आहे. याची माहिती लाभ घेणाऱ्या शेतकर्यांना असणे गरजेचे आहे.
- पाण्याचा खात्रीशीर स्त्रोत असलेले शेतकरी या योजनेस पात्र आहे.
- पारंपारिक वीज कनेक्शन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य राहील.
- वनविभागाच्या एनओसीमुळे अद्याप विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी.
- बारमाही वाहणारी नदी किंवा नाले, स्वताचे किंवा सार्वजनिक शेततळे इ. जलस्त्रोत असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे .HP
सौर कृषीपंप योजनेमध्ये लाभार्थ्यांचा हिस्सा –
लाभार्थी | लाभार्थी हिस्सा | 3 HP पंप लाभार्थी हिस्सा | 5 HP पंप लाभार्थी हिस्सा | 5 HP पंप लाभार्थी हिस्सा |
सर्वसाधारण | १० % | रु. १६५६०/- | रु. २४७१०/- | रु. ३३४५५/- |
अनुसुचित जाती | ५ % | रु. ८२८०/- | रु. १२३५५/- | रु. १६७२८/- |
अनुसुचित जमाती | ५ % | रु. ८२८०/- | रु. १२३५५/- | रु. १६७२८/- |
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेला लागणारी कागदपत्रे (Document)
- अर्जदाराचे आधार कार्ड
- ओळखपत्र
- शेतीची कागदपत्रे
- मुळ निवासाचे प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
- ७/१२ उतारा प्रत
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना २०२३ मध्ये अर्ज कुठे व कसा करावा?
महाराष्ट्र सौर कृषीपंप योजना २०२३ च्या अंतर्गत राज्यातील लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी खालील दिल्येल्या माहितीचा उपयोग करावा.
- सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- यानंतर तुमच्या पुढे वेबसाईटचे होमे पेज उघडेल या पेजवर तुम्हाला Beneficiary Services हा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- यानंतर नवीन पेज उघडेल यामध्ये तुहाला Apply Online यावर क्लिक करून New Consumer ह्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुच्यासमोर अर्ज करण्याचा फॉर्म उघडेल.
- या योजनेच्या अर्जामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहित भरायची आहे.
- जसेकी ज्या शेतामध्ये तुम्हाला सौरपंप बसवायचा आहे त्या शेतीबद्दल विचालेली माहिती आणि जवळचा महावितरण ग्राहक क्रमांक द्यावा लागेल.
- तसेच तुम्हाला तुमच्या घरचा पत्ता आणि त्या ठिकाणाबद्दल माहिती द्यावी लागेल.
- आणि तसेच तुम्हाला तुमचे कागदपत्रे अपलोड करावी लागेल.
- तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण भरून झाल्यावर सबमीट बटन वर क्लिक करून अर्ज सबमिट करवा लागेल.
- अशाप्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल.
मुख्यमंत्री सौरपंप योजना अर्जाची स्थिती कशी तपासायची ?
- तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती महावितरण च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती करू शकता.
- अर्जाची स्थिती माहिती करून घेण्यासाठी, आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- उघडलेल्या वेबसाईटवर तुम्हाला Beneficiary Services हा पर्याय दिसेल यावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला Application Status या बटनवर क्लिक करून Application Current Status या बटनवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला Beneficiary ID बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि Search या बटन ला क्लिक करायचे आहे.
- तुहाला तुमच्या अर्जाचे Application Status पेज दिसेल.
- अशाप्रकारे तुम्हाला Application Status बघायचे आहे.
FAQs
Q.1 मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना म्हणजे काय ?
राज्यातील शेतकऱ्यांना शेतामध्ये सिंचन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंप उपलब्ध करून देणार आहे, आणि या योजनेमधून पात्र असलेल्या शेतकर्यांना १,००,००० सौरपंप वाटप करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे.
Q.2 सोलर कृषीपंप म्हणजे काय ?
सौर उर्जेवर चालणारे पंप म्हणजेच सौर कृषिपंप, हे पंप सूर्यप्रकशापासुन तयार होणाऱ्या विजेवर चालतात. तसेच सौर उर्जेवर चालणाऱ्या पंपांमध्ये सोलर पॅनल, सोलर चार्ज कंट्रोलर, डी.सी. वॉटरपंप इत्यादी उपकरण वापरतात.
Q.3 या योजनेमध्ये शेतकऱ्यांना किती पैसे भरायचे आहे ?
या योजने अंतर्गत शासनव्दारे 95 टक्के अनुदान देण्यात येणार आहे आणि लाभार्थ्यांना 5 टक्के हिस्सा भरावा लागेल.