Divyang Mofat E-Riksha Vatap Yojana | अपंगांनसाठी मोफत ई-रिक्षा योजना-२०२३-२४

Divyang Mofat E-Riksha Vatap Yojana

Table of Contents

Divyang Mofat E-Riksha Yojan -२०२३-२४ – दिव्यांग व्यक्तींना महाराष्ट्र राज्यातील पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबत योजनेच्या अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदाराकडून ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे. याबद्दल पुढे आपण सविस्तर माहिती बघुयात. दिव्यांग व्यक्तींना सध्याच्या परिस्थितीमध्ये रोजगार कठीण झाले आहे, तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा काही बरी नाही. याचाच विचार करून महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. या ई-रिक्षा मुळे दिव्यांग व्यक्ती स्वताचा काहीतरी व्यवसाय सुरु करू शकेल ज्यामुळे त्यांना रोजगार सुरु होईल. यामध्ये आपण खाली काही या योजनेच्या काही अटी व शर्ती बघू .

Divyang Mofat Riksha Vatap Yojana 2023-2024

योजनेचे नाव दिव्यांगांसाठी मोफत ई-रिक्षा वाटप योजना
योजना राज्य महाराष्ट्र
योजना विभाग महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभाग
अर्ज करण्यास सुरवात ०३/०१/२०२३
अर्ज करण्यास शेवटची तारीख ०४/०१/२०२४
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने
अर्जदाराची पात्रता ४०%
अधिकृत वेबसाईट https://evehicleform.mshfdc.co.in

या योजनेसाठी अटी व शर्ती (Terms & Conditions) काय आहेत ?

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40% असावे.
  • अर्जदाराकडे दिवंगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारचे वय हे १८ ते ५५ वयोगटातील असावे.
  • मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करू शकतील.
  • दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाख पेक्षा अधिक नसावे.
  • जास्त अपंगत्व असलेल्या लाभार्थी यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • अर्जदार हा शासकीय / निमशासकीय कर्मचारी नसावा.

Terms and conditions of the scheme

  • The applicant should be domicile of the state of Maharashtra.
  • Applicant should have at least 40% disability certificate.
  • Applicant must have UDID Card.
  • Age of the Applicant should be between 18 to 55 years.
  • In the case of applicants with intellectual disabilities, their legal parents wiil be eligible to apply for the Scheme.
  • Annual income of the applicant should not exceed INR 2.50 lakhs.
  • Allocation will be made based on the severity of disability from high to mild.
  • The applicant should not be employed by the Government, Semi Government.

Divyang Mofat E-Riksha Yojanऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे – खालीलप्रमाणे आहे.

  1. अर्जदाराचा फोटो. (15Kb to 100Kb)
  2. अर्जदाराची सही. (3Kb to 30Kb)
  3. जातीचा दाखला.(Caste Certificate) (3kb ते 30kb)
  4. अधिवास प्रमाणपत्र.(Domacile Certificate)  
  5. निवासी पुरावा.(Address Proof)
  6. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र.(Disability Certificate)
  7. UDID प्रमाणपत्र.(UDID Certificate)
  8. ओळखपत्र.(Identity Proof)
  9. बँक पासबुक.(Bank Passbook)
  10. अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र.(Applicant’s Affidavit)

दिव्यांग ई-रिक्षा वाटप योजनेसाठी अर्ज कसा करावा(Divyang Mofat E-Riksha Yojan) | Online Application Process

  • सर्वातआधी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करा.
  • नंतर वेबसाईटला दिलेली माहिती वाचून घ्या.
  • प्रथम अर्जदारची नोंदणी (Registration) करा.
  • रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावरती पोर्टल वरती लॉगिन करून घ्या.
  • लॉगिन केल्यावर तुमच्या समोर फॉर्म ओपन होईल त्यामध्ये दिलेली माहित आधी निट वाचून घ्यावी.
  • त्यानंतर पुढे विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा माहिती तपासून घ्या.
  • माहिती तपासून झाल्यानंतर सबमिट बटन ला क्लिक करा.
  • अश्याप्रकारे तुम्ही ई-रिक्षा वाटप योजनेसाठी अर्ज करू शकता.

ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईटApply Online
अर्ज करण्यासाठी योजना माहिती PDF डाऊनलोड करा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

FAQ

Q) ई-रिक्षा वाटप योजनेचे अर्ज करण्याची पद्धत काय आहे ?

योजनेचे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Q) दिव्यांग मोफत ई-रिक्षा वाटप योजनेची शेवटची तारीख काय असेल ?

दिव्यांग ई-रिक्षा वाटप योजनेची शेवटची तारीख ४ जानेवारी २०२४ हि आहे.

Q) दिव्यांग मोफत ई-रिक्षा वाटप योजनेचे उदिष्ट काय आहे ?

या योजनेचे उदिष्टे जसे कि दिव्यांगाना रोजगार मिळणे, तसेच ते स्वताचा काही व्यवसाय सुरु करण्यास त्यांना मदत होईल हा या योजनेचा उदिष्ट आहे.