Maharashtra Apang Pension Yojana | महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना

Maharashtra Apang Pension Yojana

महाराष्ट्र सरकार राज्यातील प्रत्येक व्यक्तींसाठी नवनवीन योजना आणत आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील दिव्यांगांना मदत करण्यासाठी सरकारने अपंग पेन्शन योजना (Apang Pension Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अपंग असलेल्या व्यक्तींना सरकार आर्थिक मदत करणार आहे. या योजनेबद्दल खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यासाठी हा लेख पूर्ण वाचवा.

Maharashtra Apang Pension Yojana

Maharashtra Apang Pension Yojana : आज आपण यामध्ये अपंग पेन्शन योजनेबद्दल बघणार आहे. यामध्ये आपण अपंग पेन्शन योजना काय आहे? या योजनेचे उदिष्ट काय आहे, त्याचा लाभ कसा मिळवायचा, या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कुठली? तसेच या योजनेसाठी पात्रता काय असेल, तसेच या योजनेचा अर्ज कश्या प्रकारे करायचा. याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहे. अपंग पेन्शन योजनेचा लाभ अपंग व्यक्तींना जीवनाच्या समृद्धीसाठी होणार आहे. तसेच अपंग व्यक्तींना समाजात काम करता यावे आणि त्यांना शिक्षण घेता यावे, तसेच त्यांना समान संधी मिळावी, तसेच स्वयंरोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना (Maharashtra Apang Pension Yojana) सुरु करण्यात आली आहे.

  • अपंग पेन्शन योजनेचा लाभ अपंग व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी होणार आहे. या योजनेमुळे त्यांना आर्थिक मदत सुद्धा होणार आहे.
  • अपंगत्वामुळे त्यांचे जीवन दुसऱ्यांवर अवलंबून झाले आहे. राज्यातील अपंग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात अपंग पेन्शन योजना सुरु करण्यात आलेली आहे .
  • राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत अर्जदार लाभार्थ्याला प्रतिमहा 600 ते 1000 रुपयांची पेन्शन दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या पात्रता, अटी, अर्ज कुठे करावा तसेच आवश्यक कागदपत्रे कोणती असे प्रश्न तुमच्या मनात असतील, तर या सर्व प्रश्नांची उत्तरेतुम्हाला या लेखामध्ये मिळणार आहे.

महाराष्ट्र अपंग पेन्शन योजनेचा उद्देश काय ?

या योजनेचे मुख्य उद्देश हे कि राज्यातील अपंग व्यक्तींना आर्थिक सहाय्य करून त्यांच्या अपंगत्व अवस्थेला धीर देणे आहे. अपंग वक्ती हा स्वतःचे जीवन जगताना अनेक संकटांना समोर जातो. तसेच त्यांना अपंगत्वामुळे दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. राज्य सरकार त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी अश्या अपंग व्यक्तींना पेन्शनच्या स्वरुपात आर्थिक सहाय्य करून त्यांना स्वबळावर आणि सन्मानाने जगण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मदत करणे, हा या योजनेचे मुख्य उद्देश्य आहे.

महाराष्ट्र अपंग पेन्शन योजनांचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे

योजनेचे नावमहाराष्ट्र अपंग पेन्शन योजन २०२३
निधी केंद्र आणि राज्याकडून
राज्य महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट sjsa.maharashtra.gov.in
योजना उद्दिष्टअपंगांसाठी पेन्शन योजना
लाभार्थी श्रेणीसर्व श्रेणी अपंग व्यक्ती
लाभप्रत्येक लाभार्थीला दरमहा ६०० रुपये दिले जातात.
योजना श्रेणीपेन्शन योजना
संपर्कजिल्हाधिकारी कार्यालय/तहसीलदार/तलाठी
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन नोंदणी वर्ष 2022
नोंदणी2022
योजनेची स्थितीयोजना सुरू आहे.

अपंग पेन्शन योजनेचे लाभ/फायदे कोणते ?

  • अपंग पेन्शन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकार अर्जदार लाभार्थ्याला प्रतिमहा 600 ते 1000 रुपयांची पेन्शन देणार आहे.
  • 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
  • ही पेन्शनची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. त्यासाठी अर्जदार लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक असणार आहे.

महाराष्ट्र अपंग पेन्शन योजनेसाठी आवश्यक पात्रता कोणती ?

  • अर्ज करणारा अपंग व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अपंग अर्जदाराचे वय हे १८ ते ६५ वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार अपंग कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३५,०००/- हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • जर अपंग व्यक्तीला सरकारी नोकरी असेल, तर तो या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाही.
  • या योजनेअंतर्गत ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेला व्यक्तीच अर्ज करून लाभ घेऊ शकतो.

अपंग पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • ओळखपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक

महाराष्ट्र अपंग पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा ?

  • अपंग पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला किंवा तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
  • या कार्यालयांमध्ये तुम्हाला अपंग पेन्शन योजनेचा फॉर्म मिळेल.
  • फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरीत्या भरून नंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडून ती तुम्हाला जिल्हाधिकारी /तहसीलदार/तलाठी कार्यालयामध्ये जमा करावी लागतील.
  • तुमचा फॉर्म या कार्यालयांमध्ये जमा झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.
  • अर्जाची पडताळणीनंतर तुमची पेन्शन सुरु केली जाईल.

FAQ

1) महाराष्ट्र अपंग योजना काय आहे ?

महाराष्ट्र अपंग पेन्शन योजन हि १८ ते 65 वर्षे वयोगटातील ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींना आर्थिक सहाय्य प्रदान करणे ज्यामुळे त्यांना त्यांचे जीवन जगता येईल.

२) अपंग योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किती वेतन दिले जाणार आहे ?

या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून दरमहा 600 रुपये दिले जातात.

3) महाराष्ट्र अपंग पेन्शन योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?

अपंग पेन्शन योजेचा लाभ १८ ते 65 वर्षे वयोगटातील व ज्याचे अपंगत्व हे ४०% पेक्षा जास्त आहे असा अपंग व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.