Maharashtra Tar Kumpan Yojana | तार कुंपण योजना महाराष्ट्र २०२४

Maharashtra Tar Kumpan Yojana

नमस्कार मित्रांनो कसे आहात आम्ही आशा करतो कि आपण सर्व ठीक आहात. तर मला सांगायचे होते कि राज्य सरकार व केंद्र सरकार शासनाच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत असतात, देशातील किंवा राज्यातील शेतकर्यांचा विकास व्हावा तसेच शेतकर्यांचे उतप्न वाढावे आणि शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी. हा या योजनेचा उद्देश आहे. आज आपण तार कुंपण योजनेबद्दल बघणार आहे यामध्ये आपण योजनेला लागणारी कागदपत्रे, अर्ज कसा करायचा, योजनेची उदिष्टे , या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये बघणार आहे.

Maharashtra Tar Kumpan Yojana

Maharashtra Tar Kumpan Yojana : राज्यात असे बरेच शेतकरी आहे कि त्याची जमीन शेती जंगलाच्या जवळ किवा अभयारण्यात आहे. त्यामुळे शेतकर्यांना जंगली प्राण्यांचा त्रास होतो आणि आता सध्याच्या परीस्तीम्ध्ये जंगली प्राणी गावाकळे किंवा शहराकडे जास्त येत आहे त्यामुळे लोकांवर खूप हल्ले होत आहे. हे प्राणी शेतीचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान सुद्धा करतात, तर या योजनेच्या माध्यमातून शेतीच्या आजूबाजूला संपूर्ण तार कुंपण करून मिळेल. यामुळे शेतीचे संरक्षण सुद्धा होईल आणि पिकांचे नुकसान सुद्धा होणार नाही. डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास प्रकल्प अंतर्गत तार कुंपण (Maharashtra Tar Kumpan Yojana) हि योजना राबविण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्याकरिता हि योजना महत्वपूर्ण अशी आहे. शेतकरी या योजनेअंतर्गत त्यांच्या शेताला ताराचे कुंपण करू शकतात.

तार कुंपण योजनेचे उद्दिष्टे (Maharashtra Tar Kumpan Yojana)

  • राज्यामध्ये जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यावर हल्ले व त्यांच्या पिकांचे नुकसान होतात. या योजनेच्या माध्यमातून शेतीला ताराचे कुंपण केले जाणार आहे, त्यामुळे हल्ले व पिकांचे नुकसान टाळता येणार आहे.
  • शेतकर्यांच्या पिकांची होणारी नासधूस थांबवता येईल.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना ९०% अनुदान दिले जाणार आहे.
  • शेतकर्यांचा सर्वांगीण विकास करणे हा या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

कुंपण योजनेसाठी अर्ज कसा कराल ?

तार कुंपण योजनेसाठी तुम्ही अर्ज ऑनलाईन किवा ऑफलाईन पद्धतीने करू शकता तसेच शेतकर्यांना जो अर्ज करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे व कागदपत्रे सुद्धा ऑनलाईन सादर करायची आहे. परंतु सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरु झाले नसल्यामुळे लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर त्यांना त्यांच्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जाऊन हा अर्ज करू शकतो, तिथे जाऊन तुम्हाला तार कंपनी योजनाचा अर्ज सादर करावा लागेल. पंचायत समितीमधील अधिकारी तुम्हाला तार कुंपण योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगतील व तसेच कुठले कागदपत्रे लागतील. या योजने अंतर्गत करायचा अर्ज सुद्धा पंचायत समिती मार्फत उपलबध करून देण्यात येतील.

तार कुंपण योजना आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र तार कुंपण योजना अंतर्गत अर्ज करण्याकरीता लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

  • शेतकऱ्यांचे आधार कार्ड.
  • जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
  • शेतीचा ७/१२ उतारा.
  • बँक खाते पासबुक.

Maharashtra Apang Pension Yojana बद्दल सविस्तर माहिती वाचा.

मित्रानो, आम्ही अशी अशा करतो कि तुम्हाला तार कुंपण योजनेबद्दल आमच्या लेखामधून सविस्तर माहिती मिळाली असेल आणि ती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांना हि पोस्ट शेयर करावी. तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये जाऊन याबद्दल सविस्तर चौकशी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला चेक करू शकता.(यावर क्लिक करा)

|| धन्यवाद शेतकरी मित्रांनो ||