Mazi Ladki Bahin Yojana 2024: या मध्ये महिलांना मिळणार दरमहा 1500 रुपये, कसा कराल अर्ज?

Table of Contents

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहे.

Mazi Ladki Bahin Yojana 2024: आज आपण या लेखामध्ये लाडकी बहिण योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. तरीही या योजनेची १ जुलैपासून लागू केली जाणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १५०० रुपये देणार आहे. महाराष्ट्रातील महिला व मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरु केली आहे. तसेच या योजनेचा लाभ कसा व कोणाला घेता येणार, या योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करायचा तसेच आवश्यक कागदपत्रे आणि या योजनेसाठी पात्रता असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले असतील. त्यासाठी पुढील माहिती संपूर्ण वाचावी.

माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ सुमारे एक कोटी महिलांना घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना सरकारमार्फत १५०० रुपये दरमहा दिले जाणार आहे. या योजनेसाठी वर्षाला २ लाख ५० हजार ५०० रुपये पेक्षा कमी आवक आहे.

राज्यातील गरीब तसेच होतकरू महिला व मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी, तसेच महिलांना आर्थिक मदत या योजनेतर्फे होणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे उदिष्टे

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्राथमिक उद्देश असे आहे राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करणे आहे.
  • महिला व मुलींना दरमहा १५०० रुपये मिळणार आहे, या योजनेचा महत्वाचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवने हा आहे.
  • या योजनेमधून राज्यातील २१ ते ६० वयोगटातील महिलांना प्रधान्य दिले जाणार आहे. तसेच विधवा किंवा निराधार महिलांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे.

लाडकी बहिण योजनेबद्दल काही महत्वाचे मुद्दे

योजनेचे नाव लाडकी बहिण योजना २०२४
योजना कधी सुरु केली अर्थसंकल्प २०२४
योजना कोणी सुरु केली अर्थमंत्री अजित पवार
योजनेचे राज्य महाराष्ट्र
योजनेचे वर्ष २०२४
योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील महिला
योजनेचे आर्थिक सहाय्य १५०० रुपये प्रती महिना
योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने
योजनेचे अर्ज करण्याची आवश्यक असलेले अप्लीकेशनमोबाईल साठी अप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

Ladki Bahin Yojana (लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे)?

  • लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • राज्यातील विवाहित, घटस्फोटीत, आणि निराधार महिला.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी नसावे.
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बैंक खाते असणं आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana (योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे )?

  • लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/ महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला.
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ( वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणं अनिवार्य)
  • बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
  • रेशनकार्ड
  • पासपोर्ट आकारचा फोटो.
  • सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र.

लाडकी बहिण योजनेसाठी कोण अपात्र असेल?

  • ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा अधिक आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे.
  • सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे १५०० रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु वाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?

  • पात्र महिलेस योजनेसाठी अर्ज ऑनलाईन करता येईल.
  • अर्ज करण्याची पर्क्रिया योजनेचे अर्ज पोर्टल/ मोबाईल अॅपद्वारे/ सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.
  • ज्या लाभार्थ्याना अर्ज ऑनलाईन करता येत नसेल त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये(नागरी/ग्रामीण/आदिवासी) ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
  • अर्जदारांनी भरलेला फॉम अंगणवाडी केंद्रात तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये(नागरी/ग्रामीण/आदिवासी) ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन भरल्या जाईल त्यानंतर अर्जदारांना अर्ज भरल्याची पावती दिली जाईल.

Ladki Bahin Yojana(योजनेचे निष्कर्ष )

लाडकी बहिण योजना 2024 ही राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. समाजातील सर्वात असुरक्षित घटकांना मासिक आर्थिक सहाय्य प्रदान करून, त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हे या योजनेचे मुख्य आणि महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे. लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात थेट निधी हस्तांतरित केली जाईल.

ही योजना सध्या अंमलात आणली गेली नसल्याने, पात्र महिलांना नवीन म्हणजेच पुढच्या घोषणांची प्रतीक्षा करावी लागेल. महाराष्ट्र लाडकी बहिण योजना अनेक महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाच्ये आश्वासन करत आहे, यामुळे राज्यातील महिलांचा सर्वांगीण विकास आणि प्रगतीमध्ये योगदान दिले जाणार आहे.

FAQs

१) माझी लाडकी बहिण योजना ही काय आहे?

महाराष्ट्र लाडकी बहिण योजना २०२४ उद्देश्य महिलांना १५०० रुपये दरमहा आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे.

२) लाडकी बहिण योजना महाराष्ट्रामध्ये कोणी सुरु केली आहे?

महाराष्ट्राचे आर्थिकमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे.